मुंबई : सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १४ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या दुरुस्तीच्या कामात तांत्रिक कारणास्तव पुढील बदल करण्यात येत आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार 17 फेब्रुवारी ( सोमवारी ) सकाळी ६ वाजता उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू होणार होती. मात्र, आता त्यामध्ये वाढ झाली आहे.
सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी काम सुरू झालं. हे काम 17 फेब्रुवारीला रोजच्या वापरासाठी सुरू होणार होता. मात्र आता यामध्ये वाढ झाली असून मंगळवारी सकाळी वाहतुकीस सुरू होणार आहे. तांत्रिक कारणास्तव सोमवारी उड्डाणपूल वाहतुकीला सुरु करण्यात येणार नाही. मुंबई वाहतूक पोलिसांना कळवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीस सुरू होईल, असे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.
पूर्व उपनगरातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रखडले होते. मात्र आता शुक्रवारपासून हे काम सुरू करण्यास येईल. 14 फेब्रुवारी म्हणजे आजपासून ते 6 एप्रिलपर्यंत काम सुरू राहील. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाने मंजुर केले असून पहिला ब्लॉक 17 फेब्रुवारीनंतर घेतला जाईल.