मुंबई : Threat Call : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM Railway Station) आणि कुर्ला रेल्वे स्टेशन (kurla Railway Station) उडवून देण्याची धमकी देण्यात आली. रेल्वे पोलिसांना बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा कॉल आला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या फोनची माहिती यांची माहिती सर्व यंत्रणा दिली आहे. त्यानंतर श्वान पथकासह पोलीस यंत्रणेकडून (Railway police authority) कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, शहरात पोलिसांना तात्काळ हायअलर्ट जारी केला. मात्र, तपासाअंती काहीही संशयास्पद आढळून आले नाही.
मुंबईतील या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट धमकीचा कॉल आला आणि पोलीस यंत्रणा हायअलर्ट झाली. . त्यानंतर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस, आरपीएफ, बॉम्बे शोधक आणि निकामी पथक, श्वान पथकाद्वारे तपासणी मोहिम (Railway police authority) सुरु केली. यांची माहिती सर्व यंत्रणा देण्यात आली आहे. सध्या रेल्वे पोलीस या प्रकरणाची चौकशी (investigation) करत असल्याची माहिती देण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाला काल हा धमकीचा कॉल आला होता. सीएसएमटी आणि कुर्ला रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा हा फोनकॉल आला. पोलीस आणि आणि आरपीएफने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. सुरक्षा एजन्सीने जबलपूर येथे कॉल करण्याचा शोध घेतला आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.