दीपक भातुसे, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवारांनीही धमकीचा फोन आला आहे. हा धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती मिळते आहे. मातोश्रीप्रमाणे वर्षावरही धमकीचा फोन आला होता. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा फोन आला होता.
दुसरीकडे कंगना राणौत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ही धमकीचे फोन येत आहेत. कंगनावर गृहमंत्र्यांनी टिका केल्यानंतर हा फोन आल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्था मातोश्रीला बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. त्यानंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईतून धमकीचा फोन आला होता. फोन कोणी केला होता याबाबत तपास सुरु आहे.