दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांच्या राजीनाम्याबद्ल नाराजी व्यक्त केली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीनाम्याबाबत नापसंती व्यक्त केली.
- महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत असताना राजीनामा देण्याची गरज नव्हती असं मुख्यमंत्र्यांचं मत
- सूत्रांची माहिती
- पुन्हा एकदा सरकारसमोर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा समोर येणार
- सह्याद्रीवरील मंत्रीमंडळ बैठकीनंतर याबाबत झाली चर्चा
नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी नाट्य, सरकार स्थिर झाले असताना राजीनामा देण्याची गरज नव्हती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी