मुंबई : मतांची नाही मला देशाची चिंता आहे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सेनेला पटकणारा अजून जन्माला यायचाय असा टोलाही त्यांनी भाजप सरकारला लगावला आहे. भाजपने राम मंदीरचे आश्वासन पूर्ण केले नाही. यावेळे मुद्दा पुन्हा निवडणुकीसाठी घेतला. मगं तेव्हा मत का मागितली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेच्या वतीने स्थानिक लोकाधिकार समिती महाअधिवेशन 2019 चं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ही निवडणूक देशाच्या भवितव्याची असल्याने कामाला लागा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे. काहीजण कामं न करता स्वत:चीच टीमकी वाजवतात असं टोला ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
Uddhav Thackeray, Shiv Sena: Why is Lord Hanuman’s caste being discussed? If any other religions’ castes are discussed, it will be made a huge issue, but it’s okay to discuss Lord Hanuman’s caste. How sad it is. pic.twitter.com/mEPBECjFcW
— ANI (@ANI) January 13, 2019
महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी यावी असा कायदा झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात शाळांमध्ये पहिले ते 12 वीपर्यत मराठी विषय सक्तीचा असावा असा कायदा करावा अशी मागणी आम्ही करतोय तसंच याचा कायदा होत नाही तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मांडली. जे उद्योग 80 टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या देणार नाहीत त्यांचा आयकर परतावा देणार नाही. भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रस्ताव धाब्यावर बसवला जात असेल तर त्याला शिवसेना स्टाइलने उत्तर द्यावे लागेल असंही ते यावेळी म्हणाले. शिवसेनेच्या संघटनेचं काम पुढे नेण्याचं काम या संस्थेनं केल्याचे गौरवोद्गार मनोहर जोशी यांनी काढले.