Shivsna Mashal Symbole : मशालीनं आता अन्याय आणि गद्दारीला जाळून टाका अशी आक्रमक भूमिका नवं चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (SSUBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलीय. शिवसैनिक मातोश्रीवर मशाल घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना संबोधून बोलताना उद्धव ठाकरेंनी गद्दारीला जाळण्याचे आदेश शिवसैनिकांना (Shivsainik) दिले. मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी मशाल हाती घेतली. अंधेरी, सांताक्रूज विभागातल्या शिवसैनिकांनी आज उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ रॅली काढली. या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन केलं. त्यानंतर हे शिवसैनिक मशाल घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांची भेट घेतली आणि मशाल हाती घेतली.
ठाकरेंना मशाल मिळाल्यावर आणि नवं नाव मिळाल्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही ट्विट केलंय. 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अभिमानाने लढू आणि जिंकू' असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बाळासाहेबांचा जूना व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय. यामध्ये मार्तंडराव राक्षे नावाच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करताना बाळासाहेब ठाकरे दिसतायत. त्यांची निशाणी मशाल होती.
केंद्रीय निवडणूक आयोगला शपथपत्र
केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने 3 लाखाच्या वर शपथ पत्र दाखल करण्यात येणार आहे. आज त्यातील 4 मोठे बॉक्स निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले. हे सर्व शपथ पत्र जिल्हा निहाय देण्यात आले आहेत. ठाकरे गटाच्या वतीने प्रत्येक बॉक्स वर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. यामध्ये पदाधिकारी आणि प्राथमिक सदस्य असे दोन गट तयार करण्यात आले आहे.