Mumbai Local Viral Video : मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यासाठी लोकल म्हणजे लाईफलाईन (Lifeline) आहे. मुंबईत दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबईत दररोज लोकसंख्या वाढत चालली आहे, पण प्रत्येकाला सामावून घेत मुंबईची लोकल (Mumbai Local) धावतेय. मुंबई लोकल प्रवासात अनेक अनुभव मिळतात. कधी कडू तर कधी गोड. रोजच्या प्रवासात अेक मित्र-मैत्रिणी नव्याने जोडले जातात. लोकलमध्ये सणच काय तर अगदी डोहाळेजेवणही साजरं केले जातं. भजनाने तर लोकल प्रवाशांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहिला मिळतो. पण काहीवेळा एका जागेवरुन तुंबळ हाणामारीही होते आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. पण हे सर्व विसरून मुंबईकर पुन्हा लोकलमधून आपल्या दैनंदिन कामाला निघतात.
मुंबईकरांचं खास गिफ्ट
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून मुंबईकरांच्या एकतेचं आणि प्रेमाचं दर्शन होत असून लोकं कौतुक करतायत. लोकल ट्रेनच्या मोटरमनला (Moterman) नोकरीच्या शेवटच्या दिवशी (Retirement) प्रवाशांनी अनोख्या अंदाजात भेट दिली. नोकरीच्या शेवटच्या दिवशी शेवटची फेरी पूर्ण करुन मोटरमन ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गळात हार घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी त्यांचं प्लॅटफॉर्मवरच नाचत-गात त्यांचा निरोप समारंभ साजरा केला.
व्हायरल व्हिडिओत मोटरमनच्या गळ्यात हार घातलेला दिसत असून प्रवासी आणि रेल्वेचे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मुंबई रेल्वे युजर्स (@mumbairailusers) नावाने हा व्हिडिओ एक्स (X) अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत एक कॅप्शन देण्यात आला आहे. त्यात म्हटंलय,'मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनने आपल्या नोकरीचा शेवटचा दिवस पूर्ण केला. यावेळी प्रवशांनी अनोख्या पद्धतीने त्यांना निरोप दिला. संपूर्ण कारकिर्दीत एकही सुट्टी न घेता काम करणं हे कौतुकास्पद आहे'
A celebration last week when a motorman drived the local train for the last time on his retirement day.
After putting in many years of service that to without a snag is quite a big achievement.@AshwiniVaishnaw @RailMinIndia pic.twitter.com/It9wpWmMNI— Mumbai Railway Users (@mumbairailusers) September 3, 2023
एक्सवर हा व्हिडिओ 3 सप्टेंबरला शेअर करण्यता आला आहे. या व्हिडिओला जवळपास 48 हजारवेळा पाहिलं गेलं आहे. तर जवळपास हजारहून अधिक लाईक्स आले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट करत मोटरमनला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आणि त्यांनी केलेल्या सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काही युजर्सने मुंबईकरांच्या या अनोख्या निरोप समारंभाचं कौतुक केलं आहे. इतक्या वर्षांच्या सेवेनंतर असं सेलेब्रेशन व्हायलाच हवं असं एका युजरने म्हटलं आहे.