मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देत समीर वानखेडेंनी आपल्याबाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला आपण आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे. परंतु या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेही उडी घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक असे ट्वीट केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी एक ट्विट केलं आहे. लागोपाठ केलेल्या दोन ट्विटमध्ये त्यांनी दोन फोटो शेअर केलेत. समीर वानखेडे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आरोप होत असताना, आता शिवसेनेही वानखेडे यांच्या विरोधात उतरण्याचे ठरवलेले दिसते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी 'Wait and watch'असे म्हटले आहे.
wait ✋ and watch..
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 25, 2021
संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे त्यांचा इशार नक्की कोणाकडे आहे. याबाबत चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही दिवसात संजय राऊतांच्या ट्वीटचा उलगडा होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांड्येची सध्या एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. आज पुन्हा एकदा एनसीबीने अनन्याला चौकशी साठी बोलवलंय... आर्यन खान सोबतच्या ड्रग्स चॅटमुळे अनन्याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचसोबत अनन्याबाबत काही पुरावेही एनसीबीच्या हाती लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता अनन्या, आर्यनमध्ये काही आर्थिक व्यवहार झालेत का याचाही तपास होणार आहे.