अकोल्यात पण युती तुटणार?

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमध्ये युतीचं फिस्कटल्यानंतर अकोल्यात देखील तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेसाठी युती एकत्र लढणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Updated: Jan 27, 2012, 10:22 PM IST

www.24taas.com, अकोला

 

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमध्ये युतीचं फिस्कटल्यानंतर अकोल्यात देखील तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेसाठी युती एकत्र लढणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नाशिकनंतर अकोलात असं काही होणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

 

आता दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे उमेदवारी याद्या जाहीर करणार आहेत. खरंतर दोन्ही पक्षांनी सुरूवातीला युती करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपला ३९ तर शिवसेनेला ३४ जागा असं सूत्रही ठरलं होतं. मात्र प्रभाग क्रमांक १७, २५ आणि ३२ वरुन दोन्ही पक्षात वाद आहे. या तीनही जागेवर शिवसेनेनं दावा सांगितला आहे.

 

शिवसेनेच्या स्थानिक आमदारानं आपल्या नातेवाईंकासाठी दोन तिकीटांची मागणी केलेली आहे. त्यामुळं युती तुटण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष यासाठी एकमेकांना दोष देत आहेत. स्थानिक पातळीवर युती तुटल्यात जमा आहे.  युतीबाबत अखेरचा निर्णय आता मुंबईतूनच होऊ शकतो.