करिना प्रेग्नंट आहे का?

बॉलिवुड अभिनेत्री करिना कपूर ही सैफ अली खान बरोबर येत्या १० फेब्रुवारी रोजी लग्नाची बंधनात अडकणार आहे. परंतु, तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या फोटोमध्ये ती बाळंत असल्याच्या खुणा दिसत असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये आहे.

Updated: Feb 3, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

बॉलिवुड अभिनेत्री करिना कपूर ही सैफ अली खान बरोबर येत्या १० फेब्रुवारी रोजी साखरपुडा करणार आहे. परंतु, तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या फोटोमध्ये ती बाळंत असल्याच्या खुणा दिसत असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये आहे.

 

करिनाचे हे छायाचित्र विमानतळावर घेण्यात आले आहे. त्यात तीने ऑलिव्ह ग्रीन कलरचे मोठे टी- शर्ट परिधान केले आहे. अशा प्रकारचा वेश परिधान करून ती काही तरी लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या दिसत आहे. तसेच करिनाने आपले पोट एका शालीने झाकलेलेही या फोटोमध्ये दिसत आहे.

 

 

त्यामुळे ती प्रेग्नंट आहे की काही तरी लपवत आहे, ही चर्चा आता सुरू झाली आहे.

Tags: