उत्तराखंडात काँग्रेसराज, विजय बहुगुणा CM

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी तेहरीचे खासदार विजय बहुगुणा यांची निवड झाली आहे. हेमवतीनंदन बहुगुणा यांचे पुत्र असलेले विजय हे उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या यशाचे शिल्पकार मानले जातात.

Updated: Mar 12, 2012, 10:15 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी तेहरीचे खासदार विजय बहुगुणा यांची निवड झाली आहे. हेमवतीनंदन बहुगुणा यांचे पुत्र असलेले विजय हे उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या यशाचे शिल्पकार मानले जातात. तेहरी म्हणून २००९ मध्ये त्यांची लोकसभेवर निवड झाली.

 

उत्तर प्रदेशमधल्या काँग्रेसच्या नेत्या रिटा बहुगुणा यांचे ते भाऊ आहेत. विजय बहुगुणा हे उत्तराखंड योजना आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. काँग्रसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार असल्यानं नेतानिवडीची प्रक्रिया कठीण बनली होती. मात्र अखेर बहुगुणा यांच्यावर काँग्रेस नेतृत्वानं विश्वास दाखवला आहे.

 

सर्वांना बरोबर घेऊन काम करु असं निवडीनंतर त्यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून विजय बहुगुणा यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आजद यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी म्हंटलं की, निवडणुकीच्या निकालानंतर चार अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठींबा दिला आहे, आणि त्यामुळे काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग सुकर झाला.