www.24taas.com, नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभव पत्कारावा लागल्यानंतर तिसऱ्या आघाडीसाठी प्रादेशिक पक्षांच्या हालाचालींना वेग आला आहे. युपीएमधल्या तृणमूल काँग्रेससारख्या घटक पक्षांनीही मध्यावधी निवडणुकांच्या नांदीची भाषा केली आहे.
त्यातच आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्य़ानं सरकारला मोठ्य़ा अग्निदिव्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं काँग्रेसपुढं अडचणी निर्माण झाल्याचं चित्र दिसतं आहे. पंतप्रधानांनी मात्र सरकारकडं पूर्ण बहुमत असल्याचं सांगत बजेट अधिवेशन यशस्वीरित्या पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
१४ मार्चला रेल्वे अर्थसंकल्प, १५ मार्चला आर्थिक पाहणी अहवाल आणि १६ मार्चला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. लोकपाल विधेयक, अन्न सुरक्षा विधेयक, आरपीएफ विधेयक अशी ३० विधेयके सहमत करण्याचे आव्हान सरकारसमोर असेल.