www.24taas.com, नवी दिल्ली
तोंडानं वायफळ बडबड करण्यापेक्षा आपल्या कृतीला महत्त्व देणाऱ्या सचिन तेंडुलकरनं राज्यसभेतही आपली विनम्रता कायम ठेवणार असल्याचं सागितलंय.
नुकतीच सचिननं राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतलीय. आपल्या बॅटमधूनच जास्त बोलणाऱ्या मास्टर ब्लास्टरनं आपण राज्यसभेतही कधीच आरडाओरडा करणार नाही असं म्हटलंय. याचा अर्थ तो काहीच बोलणार नाही असा नाही तर ‘आपलं म्हणणं दुसऱ्यालला नम्रपणे सांगताही येते आणि समजवूनही देता येतं आणि त्यामुळेच अन्य खासदार कधीकधी जो आरडाओरडा करतात मला तसं करायची गरज नाही’ असं सचिननं स्पष्ट केलंय. तसंच कुणीही मला आरडाओरडा करण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, अशी आशाही त्यानं व्यक्त केलीय. यावेळी सचिननं ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छाही दिल्यात.
.