कोलकात्यात हॉस्पिटला आग, ५० जणांचा मृत्यू

कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून ५० जणांचा गदमरून मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Updated: Dec 9, 2011, 05:55 AM IST

झी २४ तास वेब टीम, कोलकाता

 
कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून ५० जणांचा गदमरून मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत आणखी काही  रूग्ण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

 

कोलकातामध्ये एएमआरआय हॉस्पिटलला भीषण आग लागलीय. या आगीत आणखी अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात रुग्ण आणि हॉस्पिटलच्या कर्मचा-यांचा समावेश आहे. हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आधी आग लागली. त्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलाच  आगीनं विळखा घातला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे २५ पेक्षा जास्त बंब पोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

 

तसंच हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या रूग्णांची सुटका करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. कोलक्तात खासगी हॉस्पिटलला भीषण आग, आगीत ४० जणांचा मृत्यू झाल्याची शक्य़ता. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

 

दरम्यान, घटनास्थळाला मुख्यमंत्री मतता बॅनर्जी यांनी भेट दिली. मात्र, यावेळी गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी आलेत.