www.24taas.com, अहमदाबाद
मंगळवारी मध्यरात्री गुजरातमध्ये भूंकप झाला आणि पूर्वीच्या आठवणींनी हादरा बसला. या भूंपाची कोणतीही हानी झालेली नाही. रात्री दोन वाजता ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. कच्छमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
या भूकंपामुळे अहमदाबाद, कच्छ, राजकोट, भावनगर आणि जामनगरसह अनेक परिसर हादरले. त्यामुळे येथील नागरिकामध्ये रात्रभर घबराट होती.
गुजरातमधील कच्छमध्ये २६ जानेवारी २००१ रोजी ७.६ ते ८.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात सुमारे २० हजार नागरिक ठार झाले होते. हजारो इमारती गाडल्या गेल्या होत्या तर अनेक जण बेघर झाले होते.