www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वे मंत्र्यांनी अर्थसंकल्पात भाडे वाढ केली असली तरी सर्वसामान्यांना कमीत कमी भार पडेल याची काळजी त्यांनी घेतली आहे. गेल्या नऊ वर्षात होणारी ही पहिली भाडेवाढ आहे. या नुसार लोकलच्या भाड्यामध्ये प्रतिकिमी २ पैसे, तर एक्स्प्रेसच्या भाड्यात प्रतिकिमी ३ पैशांनी वाढ केली आहे.
एसी-१ च्या प्रवासाकरता आता ३० पैसे प्रति किलोमीटर, तर एसी-२ च्या भाड्यात १५ पैसे प्रति किलोमीटर तर एसी- ३ साठी १० पैसे प्रति किलोमीटर अधिक मोजावे लागणार आहेत.
मुंबईतील लोकलचे किमान भाडे पाच रुपये असणार आहे. प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता ३ रुपयां ऐवजी पाच रुपये मोजावे लागणार आहेत. लोकलच्या प्रवाशांसाठी अशी असेल भाववाढ सीएसटी-कसारा १ रु. ३४ पैसे, पनवेल १ रु. २० पैसे महाग, चर्चगेट-विरार १ रुपये २८ पैशांनी वाढणार सीएसटी-कल्याण तिकीट १ रू. २५ पैसे रुपयांनी वाढलं
रेल्वेच्या ३०० किलोमीटर पेक्षा अधिक प्रवासासाठी १२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
लोकलचा प्रवास प्रति किमी २ पैसे, तर एक्स्प्रेस ३ पैशांनी महागला
स्लिपरचा प्रवास प्रति किमी ५ पैसे तर एसीचा प्रवास १० पैशांनी महागला
एसी २ टियर प्रवास प्रति किमी १५ तर एसी फर्स्ट क्लास ३० पैशांनी महागला
लोकलचे किमान भाडे पाच रुपये तर प्लॅटफॉर्म तिकिट ५ रुपये
सीएसटी-कसारा १ रु. ३४ पैसे,
पनवेल १ रु. २० पैसे महाग,
चर्चगेट-विरार १ रुपये २८ पैशांनी वाढणार
सीएसटी-कल्याण तिकीट १ रू. २५ पैसे रुपयांनी वाढलं