www.24taas.com, अहमदाबाद
‘मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे गुजरातचे सिंह आहेत’, अशी स्तुतीसुमनं काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी उधळलीत. काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींची प्रशंका ऐकायला मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी आणि विजय दर्डा हे एकत्र आले होते. यावेळी ‘गुजरातचा सिंह’ अशी उपाधीच दर्डांनी यावेळी मोदींना बहाल केली. दर्डांकडून आपलं कौतुक ऐकून मोदीही खूश झाले. योगगुरू बाबा रामदेवही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नुकतीच, सपाचे माजी खासदार शाहीद सिद्दीकी यांनी नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. सपानं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आता काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार विजय दर्डांनी मोदींची स्तुती केल्यानं नव्या चर्चेला उधाण आलंय.
.