बंकरमधला अर्थसंकल्प

संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री कॅमेरासमोर जी लेदर ब्रिफकेस धरतात तो ब्रिटीश वसाहतकालीन वारसा आहे. पण बजेटच्या पूर्वतयारी भोवती असलेल्या गुप्ततेकडे फारलं वक्ष वेधलं जात नाही. अर्थ विधेयक सादर करण्यापूर्वी काही आठवडे अर्थ मंत्रालयातील अधिकारी माध्यम प्रतिनिधींशी अर्थव्यवस्थेबाबत सविस्तर बोलण्यास नकार देतात.

Updated: Mar 16, 2012, 02:53 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री कॅमेरासमोर जी लेदर ब्रिफकेस धरतात तो ब्रिटीश वसाहतकालीन वारसा आहे. पण बजेटच्या पूर्वतयारी भोवती असलेल्या गुप्ततेकडे फारलं वक्ष वेधलं जात नाही. अर्थ विधेयक सादर करण्यापूर्वी काही आठवडे अर्थ मंत्रालयातील अधिकारी माध्यम प्रतिनिधींशी अर्थव्यवस्थेबाबत सविस्तर बोलण्यास नकार देतात.

केंद्रीय सरकारच्या सेक्रेटरियटमधील नॉर्थ ब्लॉकमधील अर्थ मंत्रालयाच्या इमारतीच्या तळघरात खात्याची स्वत:ची प्रेस आहे. या प्रेसमध्ये अर्थसंकल्पाची संपूर्ण छपाई केली जाते. या ठिकाणी अर्थसंकल्पाशी संबंध नसणाऱ्या लोकांना अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापूर्वी महिनाभर जाण्यास मज्जवा करण्यात येतो. अर्थसंकल्पाविषयी कोणतीही माहिती बाहेर जाऊ नयेप्रेसमध्ये काम करणारे कर्मचारी, इतर कर्माचारी वर्ग आणि अधिकाऱ्यांना यासाठी नॉर्थ ब्लॉकमध्ये शेवटच्या सात दिवसांसाठी बंद करण्यात येतं.

या सर्व लोकांचे मोबाईल फोन काढून घेण्यात येतात, इंटरनेट कनेक्शन बंद करण्यात येतात, बाहेरच्या जगाशी कोणताही संबंध प्रस्थापित होणार नाही याची दक्षता घेण्यात येते. या सर्वांसाठी जेवण बाहेरुन नेण्यात येते, झोपण्यासाठी बंक बेडची व्यवस्था असते आणि कुणी आजारी पडलं तर फक्त डॉक्टरना आत सोडण्यात येतं. बजेटच्या संदर्भात कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही प्रथा चालु करण्यात आली असा उल्लेख बजेट प्रक्रियेच्या सरकारी मॅन्युअलमध्ये आहे.

पण ही पद्धत आता कालबाह्य झालं असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. पूर्वी नियंत्रित अर्थव्यवस्थेत अबकारी आणि कस्टम्स कर याचा बाजारावर थेट परिणाम होत असे त्यामुळे त्याचं महत्व होतं. पण आता अर्थसंकल्प बदलत्या काळानूसार इतर मोठ्या अर्थव्यवस्थांप्रमाणे अर्थसंकल्प हे केवळ सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा दस्तावेज आहे.