मध्यमवर्ग उगीचच करतो बोंबाबोंब- चिदम्बरम

‘प्रत्येक गोष्ट मध्यमवर्गीयांच्या नजरेतून पाहिली जाऊ शकत नाही’ असं केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदम्बरम यांनी सरकारचा बचाव करताना म्हटलं आहे. “१ किलो तांदुळावर १ रुपया जास्त खर्च करणं मध्यमवर्गीयांना का सहन होत नाही?

Updated: Jul 11, 2012, 11:16 AM IST

www.24tas.com, बंगळुरू

 

‘प्रत्येक गोष्ट मध्यमवर्गीयांच्या नजरेतून पाहिली जाऊ शकत नाही’ असं केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी सरकारचा बचाव करताना म्हटलं आहे. “१ किलो तांदुळावर १ रुपया जास्त खर्च करणं मध्यमवर्गीयांना का सहन होत नाही? आईस्क्रीम खाताना ते १५ रुपये सहज खर्च करतात.” असा दावाही चिदम्बरम यांनी केलाय.

 

कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर पत्रकार परिषदेला संबोधित करताना चिदम्बरम म्हणाले की यूपीएचं सुरूवातीचं काम चांगलं होतं.मात्र गेल्या २-३ वर्षांत सरकारला काही आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे. पण सरकार या देशाला नक्कीच या गर्तेतून बाहेर काढेल.

 

मध्यमवर्गीय मानसिकतेवर हल्ला चढवताना चिदम्बरम म्हणाले, काही लोक पाण्याच्या बाटल्यांवर १५ रुपये खर्च करतात. आईस्क्रीमवर उधळपट्टी करतात.पण गहू १ रुपयाने जरी महागला, तरी त्यांना सहन होत नाही.

 

भाजपाने चिदम्बरम यांच्या विधानावर सडकून टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी मेहणाले, “मध्यमवर्गाची चेष्टा करण्यासाठीच चिदम्बरम यांनी हे विधान केलं असावं. या विधानातून सरकारचं मध्यमवर्गीय लोकांबद्दल असणारं मत दिसून येतं.” चिदम्बरम यांचं वक्तव्य असंवेदनशीलतेचं प्रतीक असून यातून सिद्ध होतं की चिदम्बरम सर्वसामान्य लोकांचं दुःख कधीच समजू शकत नाही. कारण, त्यांनी स्वतःला कायम एअर कंडिशन्ड खोलीपुरतंच मर्यादित ठेवलं आहे. वाढत्या महागाईला अवाक्यात आणणं त्यांना शक्य होत नाही म्हणून चिदम्बरम मध्यमवर्गाला टार्गेट करून अपमान करत आहेत.