www.24taas.com, मुंबई
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती फारच चिंताजनक आहे. त्यामुळेच त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे. चेन्नईमधील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांना भेटण्यासाठी त्यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची सून जेनेलिया हे हॉस्पिटलला पोहचले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख आपली किडनी स्वत:च्या वडिलांना देण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र डॉक्टरांनी म्हटले आहे की, टिश्यू मॅचिंग झाल्यानंतरच त्याबाबत फैसला केला जाईल.
काल अचानक विलारावांची तब्येत जास्त बिघडली. आणि प्रकृतीत जास्तच बिघाड झाल्याने त्याना मुंबईहून चेन्नईला हलविण्यात आले. काही दिवसांपासूनच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्या उपचारांचा काहीही फायदा होत नसल्याने त्यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आले. मात्र यकृतात झालेला बिघाडामुळे त्यांची प्रकृती जास्तच चिंताजनक झाली आणि त्यांच्या दोनही किडन्या काम करीत नसल्याचे समजते.