शिवसेनेसाठी ठाणे खणखणीत नाणे

ठाणे महापालिकेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून शिवसेनेने परत एकदा ठाणे आपला बालेकिल्ला असल्याचं सिध्द केलं आहे. शिवसेनेने ५१ तर भाजपने ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे १३० सदस्य संख्येच्या सभागृहात सेना-भाजप युती बहुमताचा आकडा अपक्षांच्या मदतीने सहज गाठेल हे नक्की.

Updated: Feb 17, 2012, 12:53 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाणे महापालिकेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून शिवसेनेने परत एकदा ठाणे आपला बालेकिल्ला असल्याचं सिध्द केलं आहे. शिवसेनेने ५१ तर भाजपने ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे १३० सदस्य संख्येच्या सभागृहात सेना-भाजप युती बहुमताचा आकडा अपक्षांच्या मदतीने सहज गाठेल हे नक्की. त्यातच चार शिवसेना बंडखोर विजयी झाल्याने शिवसेनेचाच महापौर विराजमान होईल हे जवळपास निश्चित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ आणि काँग्रेसने १७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आघाडीने एकूण ५१ जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र नवनिर्मा सेनेला नऊ जागांवर विजय मिळवता आला. बहुजन समाज पक्षाने दोन, रिपाइंने एक तर सपाने एक जागेवर विजय मिळवला आहे.

 

 

Tags: