www.24taas.com, शिर्डी
राज्यात वाळू तस्करांचा उच्छाद सुरुच असल्याचे पाहायला मिळाले. जळगाव येथील तहसीलदारांची गाडी जाळल्याची घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे नायब तहसीलदार राहुल कोतांडें यांना वाळूची तस्करी करणाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
कोताडे हे रात्री वाळू तस्करांवर कार्यवाही करण्यासाठी सावळीविहीर कडे जात होते. शिर्डीकडे येणारा वाळूचा डंपरच नायब तहसीलदारांनी तपासणी करण्याकरता थांबविला असता त्यांना मारहाण करण्यात आली.शिर्डी पोलिसांनी तहसीलदारांना मारहाण केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान वाळु तस्कांच्या वाढत्या मिरुजोरीचा निशेध करत आज राहाता तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही पुकारले होते.
राज्यात वाळू तस्कारांची मुजोरी दिवसें दिवस वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर प्रवरा.मुळा आणि गोदावरी नदी पात्रातुन बेसुमार वाळु उपसा करणाऱ्या वाळू तस्कारांची मजल थेट तहसीलदारांवर गोळीबार करण्या पर्यंत गेली होती. राज्याचे महसुलमंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याच तालुक्यात अवैध्य वाळू वाहतुक करणाऱ्या भरधाव डंपरने उडविल्याने पाच लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असूनही अवैध्य वाळू तस्करी मात्र थांबतांना दिसत नाही. रात्री राहात्याचे नायब तहसील दार राहुल कोतांडे अश्याच प्रकारे वाळू तस्करांनी मारहाण केली आहे.
तालुकयातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास औरंगाबाद उच्च न्यायलयाची मनाई असताना गोदावरी नदीपात्रात अवैध्यरित्या मोठ्या प्रमाणात वाळुची वाहतूक सुरु आहे. वाळूची तस्करी होतानाही, नाकाबंदी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडुन आणि आर.टी.ओ.विभागाकडुन या वाळु वाहनांवर मात्र कार्यवाही केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.