साईबाबा संस्थान कारभारवर संशय

शिर्डीतील साईबाबा संस्थानचा कारभार चोख व पारदर्शी व्हावा यासाठी राज्य सरकारनं २००४ मध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली खरी, मात्र कारभार पारदर्शी होण्याऐवजी त्याभोवती संशयाचं जाळंच निर्माण झालं. या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी या दानाचा वापर स्वत:ची मोबाईलची हौस भागवण्यासाठी केल्याचं समोर आले आहे.

Updated: Apr 13, 2012, 11:51 AM IST

www.24taas.com, शिर्डी

शिर्डीतील साईबाबा संस्थानचा कारभार चोख व पारदर्शी व्हावा यासाठी राज्य सरकारनं २००४  मध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली खरी, मात्र कारभार पारदर्शी होण्याऐवजी त्याभोवती संशयाचं जाळंच निर्माण झालं. या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी या दानाचा वापर स्वत:ची मोबाईलची हौस भागवण्यासाठी केल्याचं समोर आले आहे.

विविध कारणांनी अडचणीत असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचं यापूर्वीचं विश्वस्त मंडळ आता आणखी संकटात सापडलय. मोबाईल खरेदी आणि मोबाईल बिलावर वारेमाप खर्च करत साई संस्थानच्या पैशाचा गैरवापर केल्याचं उघड झाल आहे. कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे..

ऑगस्ट २०१० मध्ये लंडनमध्ये भरवण्यात आलेल्या साई भक्त संमेलनादरम्यान तत्कालीन अध्यक्ष जयंत ससाणेंचं मोबईल बिल होतं ३३ हजार रुपयांचं तर संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांचं बिल गेलं ५३ हजारांच्या घरात. ही बिलं भरली गेली ती साईसंस्थानच्या तिजोरीतून. तर साई संस्थानचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी २० हजारापर्यंतचे विविध कंपन्यांचे सहा मोबाईल खरेदी केले ते या दानातूनच.

कोणतेही निश्चित नियम न आखल्यानं ही सगळी उधळपट्टी होणं स्वाभाविक असल्याचीही चर्चा रंगतेय..शिर्डी विमानतळाला दिलेला निधी, साई संस्थानच्या वाहनांचा गैरवापर, परदेशातली साई भक्त संमेलनं, आणि राजकारण्यांचा भरणा अशा अनेक कारणांनी वादात सापडलेल्या जुन्या विश्वस्त मंडळाच्या मागं हे नव शुक्लकाष्ट लागलय.