दुष्काळग्रस्तांसमोर कासारे गावाचा आदर्श

दुष्काळात होरपळणा-या राज्यातल्या शेकडो गावांसाठी अहमदनगरच्या कासारे गावानं आदर्श निर्माण केलाय. जलव्यवस्थापनाच्या जोरावर या गावानं पाणीटंचाईवर मात केलीये. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्यासाठी भटकंती सुरु असताना कासारे गाव 'सुजलाम सुफलाम' आहे.

Updated: May 26, 2012, 08:06 AM IST

निखील चौकर, www.24taas.com, पारनेर

दुष्काळात होरपळणा-या राज्यातल्या शेकडो गावांसाठी अहमदनगरच्या कासारे गावानं आदर्श निर्माण केलाय. जलव्यवस्थापनाच्या जोरावर या गावानं पाणीटंचाईवर मात केलीये. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्यासाठी भटकंती सुरु असताना कासारे गाव 'सुजलाम सुफलाम' आहे.

दुष्काळात होरपळणा-या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या कासारे गावानं जलव्यवस्थापनाच्या जोरावर ही किमया साधली आहे. त्यामुळंच बहुतांश महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना कासारे गाव मात्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. कासारेतल्या गावक-यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, ‘हरियाली’, ‘सामाजिक वनीकरण’, ‘इंडो जर्मन पाणलोट’ असे कार्यक्रम राबवले. त्यामुळ गावातल्या विहिरींची पाणी पातळीही उत्तम आहे. साहजिकच पाणी असल्यानं गावातली शेतंही हिरवीगार आहेत.

सरकारच्या मदतीच्या कुबड्या घेण्याऐवजी पाण्याचं व्यवस्थापन केल्यास दुष्काळ गावाच्या आसपासही फिरकणार नाही हे कासारेवासियांनी दाखवून दिलंय. कासारेची जलस्वयंपूर्णता पाहिल्यावर सध्याचा दुष्काळ मानवनिर्मित तर नाही ना असा सवाल उपस्थित झालाय.