www.24taas.com, नवी दिल्ली
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलीये. मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदूत्ववादी संघटनांचं नाव गोवण्यात यावं यासाठी हेमंत करकरे यांच्यावर दबाव होता असं वक्तव्य भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली.
मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदुत्ववादी संघटना यांचा हात होता असं एटीएसने आरोप ठेवला होता. त्यामुळे तत्कालिन एटीएस प्रमुख आणि २६/११ च्या हल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांना हिंदुत्ववादी संघटनानी चांगलेच टार्गेट केले होते.
'मालेगाव स्फोटात हिंदू संघटनांना गोवले जावे यासाठी हेमंत करकरे यांच्यावर दबाव असल्याचे वक्तव्य आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर कोर्टाने त्यांना फटकारले आहे. '