कार्बनडाय ऑक्साईडचं काळं सत्य

१९९० ते २०१० या वर्षांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड गॅसचे उत्सर्जन हे सगळ्यात जास्त होते. दोन दशकमध्ये या उत्सर्जनामध्ये ४५ टक्के वाढ झालेली आहे. २०१० मध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन ३३ अब्ज टन होतं. जे की आतार्यत सर्वाधिक आहे.

Updated: Sep 27, 2011, 01:02 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

प्रदूषण म्हणजे देश आणि साऱ्या जगाला भेडसावणारी समस्या, त्यातच वायु प्रदूषणाने तर अगदी कहरच केला आहे. वायु प्रदूषण हे फक्त पर्यावरणालाच नाहीतर मानवी शरीराला अपायकारक आहे,  आणि याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात आपण्यास दिसून येतील.

[caption id="attachment_1030" align="alignleft" width="300" caption="कार्बनडाय ऑक्साईडचं होणारं उत्सर्जन"][/caption]

 

१९९० ते २०१० या वर्षांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड गॅसचे उत्सर्जन हे सगळ्यात जास्त होते. दोन दशकमध्ये या उत्सर्जनामध्ये ४५ टक्के वाढ झालेली आहे. २०१० मध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन ३३ अब्ज टन होतं. जे की आतार्यत सर्वाधिक आहे. ग्लोबल वार्मिंग निर्माण होण्यामध्ये कार्बनडाय ऑक्साईडची महत्त्वाची भूमिका आहे.

 

याच काळात याचे उत्सर्जन युरोपीय देशामध्ये ७ टक्के आणि रशियामध्ये २८ प्रति तास, तर अमेरिकेमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जपानमध्ये हे उत्सर्जन पूर्वीइतकंच आहे.

 

विकसनशील देशात वीज आणि दळणवळण यासारख्या क्षेत्रात होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडचा  उत्सर्जनांची भरपाई म्हणून सौरउर्जा, अक्षय उर्जेचा वापर करणं गरजेचं आहे. ज्या देशामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचा उत्सर्जनामध्ये वाढ झाली त्यातील प्रमुख देश चीन (१० टक्के) अमेरिका (४ टक्के) आणि भारत (९ टक्के).

 

क्योटो प्रोटोकॉलने कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष ठेवले आहे. क्योटो प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करणारे देश आणि अमेरिकेचे १९९० मधले एकूण कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनामध्ये दोन तृतीयांश सहभाग असल्याचे आढळते.

Tags: