www.zee24taas.com, न्यू यॉर्क
जड शॉपिंग बॅगांइतकी साधी गोष्टही आपला मानसिक तणाव वाढवू शकते. नुकत्याच एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. यातील प्रयोगात अभ्यासकांनी एका समुहाला एका विषयावर आपलं मत देण्यास सांगितलं. मात्र, त्याआधी सामानाने भरलेली शॉपिंग बॅग धरायला लावली. याचवेळी दुसऱ्या समुहाचे हात मात्र रिकामे ठेवण्यात आले.
‘कंझ्युमर रिसर्च’ या सायन्स पेपरनुसार, ज्या लोकांच्या हातात शॉपिंग बॅग होती, त्या लोकांनी रिकाम्या हाताच्या लोकांपेक्षा जास्त त्रासिकपणे प्रश्नांना प्रतिसाद दिला.
'डेली मेल' या सायन्स पेपरनुसार, चायनिज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे संशोधक मेंग ज्यांग आणि ज्यूपिंग ली यांचंही म्हणणं असंच आहे की हातातील भौतिक वजन माणसाच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम करीत असते.
गंमत म्हणजे प्रयोगादरम्यान हातात वजन असणाऱ्या लोकांना फुगे, पिसं इत्यादी हलक्या फुलक्या गोष्टींबद्दल विचार करायला सांगितल्यावर मात्र त्यांच्या मनातील नकारात्मक भाव नष्ट झाले.