कांबळीचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे- शरद पवार

विनोद कांबळीने १९९६ साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनल मॅच फिक्सिंग संदर्भात केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याची प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांचे याबाबतीत काय म्हणणं आहे यावर मी विश्वास ठेवेन असं पवार म्हणाले. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कांबळीने केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचं पवार म्हणाले.

Updated: Nov 19, 2011, 03:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

विनोद कांबळीने १९९६ साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनल मॅच फिक्सिंग संदर्भात केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याची प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांचे याबाबतीत काय म्हणणं आहे यावर मी विश्वास ठेवेन असं पवार म्हणाले. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कांबळीने केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचं पवार म्हणाले. केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी कांबळीने केलेल्या आरोपां संदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली होती ती बीसीसीआयने धूडकावून लावली त्याच दिवशी पवारांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

मी अजित वाडेकर, सचिन तेंडूलकर किंवा सौरव गांगुली यांच्यावर विश्वास ठेवेन असं शरद पवार म्हणाले. कांबळी जर प्रामाणिक असता तर त्याने १९९६ सालच्या वर्ल्डकपनंतर हे आरोप करायला हवे होते त्या ऐवजी तो आता त्या संदर्भात बोलत आहे असंही ते म्हणाले. कांबळीने जर क्रिकेटला महत्व दिलं असतं तर आज तो सचिन तेंडूलकर इतकाच मोठा खेळाडू झाला असता पण त्याने आपल्या करिअरकडे लक्ष दिलं नाही असं मत पवारांनी व्यक्त केलं. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी देखील कांबळीने केलेल्या दाव्यांमध्ये तथ्यांश नसल्याचं म्हटलं आहे.