पराभवासाठी बॅट्समेन जबाबदार !

भक्कम समजली जाणारी टीम इंडियाची बॅटिंग लाईन-अप कांगारूंच्या भेदक माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. टीम इंडियाच्या बॅट्समनच्या या खराब कामगिरीमुळेच टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागल्याची कबुली कॅप्टन धोनीनेही दिली.

Updated: Jan 1, 2012, 09:18 AM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

भक्कम समजली जाणारी टीम इंडियाची बॅटिंग लाईन-अप  कांगारूंच्या भेदक माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आपल्याला मेलबर्न टेस्टमध्ये पहायला मिळाली. टीम इंडियाच्या बॅट्समनच्या या खराब कामगिरीमुळेच टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागल्याची कबुली कॅप्टन धोनीनेही दिली.

 

कागदावर भक्कम वाटणाऱ्या टीम इंडियाच्या बॅट्समनचा फ्लॉप शो मेलबर्न टेस्टमध्ये पहायला मिळाला. या टेस्टमध्ये कांगारूंच्या भेदक माऱ्यापुढे टीम इंडियाच्या दिग्गज बॅट्समनने अक्षरश: शरणागती पत्करली. टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये सचिन, द्रविड आणि सेहवागने हाफ सेंच्युरी झळकावली खरी. मात्र लक्ष्मणसहित इतर एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या इनिंगमध्ये एकाही बॅट्समनला हाफ सेंच्युरी करता आली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये २९२ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा एकही बॅट्समन पिचवर टिकू शकला नाही. पूर्ण टीम १६९ रन्सवर गारद झाली. या पराभवासाठी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने बॅट्समनच्या खराब कामगिरीलाच जबाबदार धरलं आहे.

 

धोनीच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाच्या बॅट्समनची खराब कामगिरी अशीच कायम राहिली तर टीम इंडियाला या सीरिजमध्ये कमबॅक करणं नक्कीच कठीण होऊन बसेल. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे बॉलिंग डिपार्टमेंट युवा आणि अनुनभवी आहे, तरीही टीम इंडियाच्या दिग्गज बॅट्समनची त्यांचा मुकाबला करताना चांगलीच तारांबळ उडाली. खरतर टीम इंडियाची बॅटिंग लाईन-अप मजबूत असून बॉलिंग डिपार्टमेंट कमजोर असल्याचं बोललं जात होत. मात्र प्रत्यक्षात बॉलर्सने आपल्या कामगिरीने साऱ्यांना प्रभावित केलं तर बॅट्मेननी अपेक्षाभंग केला. आता आगामी सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समनसमोर कमबॅक करण्याच आव्हान असणार आहे.

 

 

Tags: