www.24taas.com, मीरपूर
शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेल्या फायनलमध्ये पाकिस्तानंन बाजी मारत एशिया कप जिंकलाय.. मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर पाकिस्तानंने बांगलादेशवर 2 रन्सने विजय मिळवलाय..
पाकिस्तानच्या 237 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना बांगलादेशची सावध सुरुवात झाली होती..तमीम इकबाल आणि शाकिब-अल-हसन या दोघांच्या हाफ सेंच्युरीच्या मदतीनं बांगलादेशानं पाकिस्तानला चांगली टक्कर दिली... शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी बांगलादेशला 9 रन्सची गरज होती मात्र ऐजाझ चिमानं जबरदस्त बॉलिंग करत पाकला विजय मिळवून दिला... पाककडून ऐजाझ चिमानं 3, उमर गुलनं 2 तर सईद अजमलनं 2 विकेट्स घेतल्या..
एशिया कपच्या फायनलमध्ये बांग्लादेशनं पाकिस्तानसमोर 237 रन्सचं आव्हान ठेवलय. प्रथम बॅटिंगला उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. ओपनिंग बॅट्समन नासिर जमशेद 9 रन्सवरच पॅव्हेलियनमध्ये परतला. सुरूवातीलाच पाकिस्तानने झटपट तीन विकेट्स गमावल्या. पाकिस्तनच्या 70 रन्सवर 4 विकेट्स गेल्या होत्या.
अखेरीस शाहिद आफ्रिदी आणि सरर्फराज अहमदने केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तान दोनशेचा आकडा ओलांडू शकली. मोहम्मद हाफिजने 40 तर सर्फराज अहमदने नॉट आऊट 46 रन्स केल्या. उमर अकमल आणि हमद आझमने प्रत्येकी 30 रन्स केल्या. तर शाहिद आफ्रिदीने 32 रन्स केल्या. बांग्लादेशकडून मश्रफे मोर्तझा, अब्दुर रझ्झाक आणि शाकिब अल हसननने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.