www.24taas.com, मुंबई
पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मारहाणप्रकरणी शुक्रवारी अटक झाल्यानंतर ते कोठडीत होते. आज त्यांना जामीन मिळालाय.
झी 24 तासला सूत्रांकडून मिळालेल्य़ा माहितीनुसार सुटका झाल्यानंतर ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राजीनामा देतील अशी चर्चा त्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या वसई नालासोपारा सुरु आहे.
खाकी विरुद्ध खादी संघर्ष चिघळला
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सुर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.
आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचं कामकाज सुरुवातीला तहकूब करावं लागलं होतं. हे आमदार पुरावे नष्ट करू शकतात, असं कारण सांगत पोलिसांनी जामीनास विरोध केला होता...
यामुळे सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी आहे. तसंच हे प्रकरण जास्त न वाढवण्याचे आदेश गृहमंत्रालयानं पोलिसांना दिले होते. हे आदेश धाब्यावर बसवून पोलिसांनी आमदारांविरोधात आघाडी उघडल्याचा आरोप केला जातोय. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.