२ फेब्रुवारी १९६१ मध्ये उंबरखिंडीच्या युद्धाला तब्बल ३५0 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या प्रसंगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी 'लाईट अँड साऊंड शो' सादर केला जात आहे. बादशाह औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान सव्वालाख सैन्य घेऊन पुण्यात आला होता. त्या वेळी मोगल सरदार कार्तलबखान आणि पंडिता रायबागन हे ३0 हजारांचे सैन्य घेऊन कोकणवर आक्रमण करण्यासाठी निघाले. त्या वेळी शिवाजीमहाराजांनी केवळ ३ हजारांच्या सैन्यांसह लोणावळ्याजवळील उंबरखिंडीत त्यांना गाठून पराभव केला आणि त्यांना शरणागती पत्करायला लावून त्यांच्या जवळ असणारा सर्व खजिना, तोफा अशा सर्वच गोष्टी हस्तगत केल्या.
हा प्रसंग जिवंत करून दुर्लक्षित इतिहास पुणेकरांसमोर ठेवण्याचे काम मंडळाने केले आहे. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत या शोचे आयोजन करण्यात आले असून, १ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ९ या वेळेत हा अध्र्या तासाचा शो सर्वांसाठी खुला राहणार आहे. ४0 फूट लांब असलेली भव्य प्रतिकृती, शेकडो दिव्यांची आरास, चित्तथरारक चित्रपट दृश्ये आणि शिवरायांच्या युद्ध चातुर्याचे, भौगोलिक ज्ञानाचे आणि पराक्रमी स्वभावाचे केलेले चित्रण हे याचे खास वैशिष्ट्य आहे.