www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा, चंद्रपूर
बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.
गेल्या दोन दिवसांत बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. लोणारमध्ये सर्वाधिक ४१९ मिमी पावसाची नोंद झालीय. अतिवृष्टीमुळं २० जनावरं पाण्यात वाहून गेलीत.. तर तब्बल ७०० हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. या सर्व नुकसानीचं सर्वेक्षण करुन अहवाल तहसिलदारांना देण्यात येणार असल्याची माहिती निवासी जिल्हाधिका-यांनी दिलीय.
चंद्रपूर जिल्ह्यात संततधार कायम आहे. गेल्या १० दिवसांपासून पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलंय. चंद्रपूर-हैदराबाद, चंद्रपूर-गडचिरोली, चंद्रपूर-यवतमाळ हे महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झालेत.
इरई धरणाची तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आलेत. अप्पर वर्धा धरणाचेही दरवाजे उघडण्यात आलेत. दरम्यान प्राणहीत नदीला पूर आलाय. प्राणहीता आणि गोदावरी संगमाचे ठिकाण असलेल्या सिरोंचा शहरातील काही भाग हा जलमय झालाय.
दुसरीकडे दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. दहा दिवसांच्या पावसामुळे दुबार पेरणी वाहुन गेलीये. चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झालंय. तर तीन हजार घरांची पडझड झालीये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.