www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
सतरा तासाच्या थरारानंतर अखेर पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आलं आहे. काल दुपारी तीन वाजता पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रात्रभर वनविभागाचे १५० कर्मचारी, पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्नांची शर्थ करीत होते.
मात्र बिबट्या सतत हुलकावण्याच देत होता. रात्रभर सर्च लाईटच्या प्रकाशातही बिबट्याचा शोध घेतला जात होता अखेर बांबूच्या झाडाखाली बिबट्या लपला असल्याचं कर्मचा-यांच्या लक्षात आल आणि कर्मचा-यांनी तातडीने बिबट्या लपला होता. त्या ठिकाणावर चारही बाजूंनी तारेचे कुंपण टाकले तरी सुद्धा बिबट्या कर्मचा-यांच्या अंगावर धावून येत होता. त्यामुळे पुढं जाण्याचीही कुणाची हिंमत होत नव्हती अखेर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वनखात्याचे काही कर्मचारी कुंपणात गेले आणि बिबट्याला डार्ट गनच्या साहाय्याने बेशुद्ध करण्यात आलं.
१७तासांची वनविभागाची पीक्षा संपली. रात्रभर वनविभागाच्या कर्मचा-यासह वरिष्ठ अधिकारी सुद्धा घटनास्थळीच ठाण मांडून होते.. बिबट्याला पकडल्यावरच त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.