Airtel tariff Hike: ट्रायच्या निर्देशानंतर दूरसंचार कंपन्यांनी आपल्या यूजर्ससाठी कॉलिंग आणि एसएमएसचा रिचार्ज प्लान जाहीर केलेयत. अनेक कंपन्यांनी आपले नवे रिचार्ज प्लान जाहीर केलेयत. यामुळे ग्राहकांना फायदा होतोय. या पार्श्वभूमीवर एअरटेल यूजर्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी एअरटेल यूजर्सना महत्वाचे संकेत दिले आहेत.
एअरटेलने मोबाईल सेवा शुल्क वाढवून आणि प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) रेकॉर्ड केला. याच्या काही महिने होत नाहीत तोवर आर्थिक शाश्वततेसाठी सेवा शुल्कात आणखी वाढ करणे आवश्यक असल्याचं कंपनीनं म्हंटलय. त्यामुळे एअरटेल नजीकच्या भविष्यात दर वाढवेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दूरसंचार सेवा प्रदात्या भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. कंपनीच्या तिमाही निकालांनंतर ते तज्ञांशी संवाद साधत होते. एअरटेल कंपनी नेटवर्कमधील गुंतवणूक कमी करत आहे. असे असले तरी आमचे लक्ष ट्रान्समिशन क्षमता निर्माण करणे, ग्राहकांचा अनुभव सुधारणे आणि देशांतर्गत ब्रॉडबँड सेवांचा विस्तार करण्यावर राहील, असे ते म्हणाले.
एअरटेल बल्क कॉल्स आणि मेसेजिंग व्यवसायातून बाहेर पडेल. हा आमच्या जागतिक व्यवसाय पोर्टफोलिओचा एक भाग असल्याचे ते म्हणाले. उद्योग आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी आणि सातत्याने वाजवी परतावा देण्यासाठी सेवा शुल्कात आणखी काही सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 'चालू आर्थिक वर्षासाठी आमचा भांडवली खर्च आर्थिक वर्ष 2023-24 पेक्षा कमी असेल. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तो कमी होत राहील असे आम्हाला वाटते. डिजिटल क्षमता निर्माण करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. भारताचा ARPU जागतिक स्तरावर सर्वात कमी असल्याचे गोपाल विट्टल म्हणाले.
जिओकडे खूप सारे रिचार्ज प्लान्स आहेत, जे वेगवेगळ्या सेगमेंट आणि किंमतीत येतात. आता आपण एका स्पेशल रिचार्जबद्दल जाणून घेऊया. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना 3 महिने म्हणजे साधारण 84 दिवसांची वॅलिडीटी मिळेल. सर्वात स्वस्त प्लानबद्दल तपशीलवार जाणून घेऊया. जिओचा रिचार्ज प्लान जिओ पोर्टलवर लिस्टेड आहे. त्यानुसार या प्लानची किंमत 448 रुपये आहे. या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगदेखील मिळेल. यूजर्सना 1000 एसएमएस मिळतील. ज्यामुळे संवाद साधणं सोपं होऊन जाईल. यात तुम्हाला जिओ, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा मोफत एक्सेस मिळेल.