www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
अभिनेत्री बनण्यासाठी जालन्यातील दोन शाळकरी मुलींनी घरातून पळ काढला...मात्र औरंगाबादला आल्यावर त्यांचा धीर सुटला..पण घरी कसं जायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. घरचे रागवतील या भीतीने त्यांनी जी कथा सांगितली त्यामुळे औरंगबाद पोलिसांची चांगलीच धावपळ उ़डाली..
अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळून जाणा-या तरुणीची कथा तुम्ही अनेक चित्रपटातून बघितली असेल. पण जेव्हा ही कथा वास्तवात घडते तेव्हा काय होतं याचा अनुभव औरंगाबादच्या रेल्वे पोलीसांनी घेतलाय. जालन्यातील रहिवासी असलेल्या दोन शाळकरी मुली या कथानकाच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत....
शाळेतून घरी परतत असतांना काही लोकांनी आपलं अपहरण केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. अपहरणकर्ते आपल्याला औरंगाबदमध्ये घेऊन आल्यानंतर कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतल्याचं या मुलींनी सांगितलं. पण प्रत्यक्षात घडलेली घटना काही वेगळीच होती.
य़ा दोन शाळकरी मुलींनी सांगितलेल कथा मोठी रंजक असली तरी वास्तव काही वेगळचं होतं... आठव्या वर्गात शिकणा-या सह वर्गमैत्रिणींनी आशिकी-२ हा चित्रपट एकत्र बघितला आणि त्यांनी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. स्कूल बॅगमध्ये कपडे भरले. यापैकी चौघींच्या घरच्यांना त्यांचा हा प्लॅन समजल्यावर त्यांनी आपल्या मुलींना शाळेतून घरी नेलं. मात्र या दोघींनी आपला निर्णय कायम ठेवला. औरंगबादला आल्यावर मात्र या दोघींचा धीर सुटला.
घरी परतायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर होता. घरी आईवडिल रागवतील अशी भीती त्यांना सतावू लागली म्हणूनच त्यांनी अपहरण झाल्याचा बनाव रचला. पोलीस चौकशीत सगळ काही स्पष्ट झालं..मात्र या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.