www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आधुनिक जीवनशैलीनुसार आपला आहार करण्याची पद्धत बदलून गेली आहे. आता पाट पाणी घेऊन जमिनीवर जेवण्याऐवजी डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत रुढ झाली आहे. पण प्राचीन काळापासून सुरू असणारी जमिनीवर बसून जेवणाची पद्धत ही आरोग्यासाठी जास्त फायद्याची आहे.
डायनिंग टेबलवर बसून जेवण्यामुळे आरोग्यविषयक अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. जे लोक जमिनीवर बसून पारंपरिक पद्धतीने जेवतात, त्यांना लहान मोठे आजार होत नाहीत. याचं कारण म्हणजे जमिनीवर मांडी घालून आपण जेवायला बसतो, तेव्हा आपण एका विशिष्ट योगासन घालून बसलेलो असतो. या आसनाला सुखासन म्हणतात.
सुखासनामुळे पचन व्यवस्थित होण्यास मदत होत. शरीरावर कुठल्याही प्रकराचा अतिरिक्त भार नसतो. सुखासनात बसल्यामुळे अन्न पचनात बाधा येत नाही. शऱीर ताठ राहातं आणि त्यामुळे अन्न नलिकेतून जेवण योग्य पद्धतीने पोटात जातं. डायनिंग टेबलवर बसून जेवल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.