www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टन
फेसबुकने नव नवीन बदल करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आता तर आणखी एक पाऊल पुढे टाकून ज्यांचे कोणाशी डेटिंग सुरू आहे. त्यांचे केव्हा ब्रेकअप होणार, याची भविष्य सांगण्याची पद्धत फेसबुक सांगणार आहे. भविष्य आणि ब्रेकअपबाबत संशोधकांनी जी पद्धत शोधली आहे. ती पद्धत फेसबुक आपल्या सोशल सर्व्हीस साईटच्या माध्यमातून सांगणार आहे.
कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक आणि फेसबुकच्या इंजिनिअरनी ही नवी भविष्य सांगण्याची पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीला `डिसपरसन` असे संबोधले आहे. संशोधकांनी यासाठी १.३ लाख फुसबुक वापरणाऱ्यांच्या सवयीचाअभ्यास केला. त्यातून डेटिंगनंतर ब्रेकअपबद्दल माहीत पुढे आहे.
कोणकोणाबरोबर डेटिंगसाठी जाणार आहेत. हे ६० टक्के तंतोतंत शोधून काढले. `डिसपरसन` ज्या व्यक्तीचे डेटिंग कोणाशी होतेय हे सांगणे अवघड जातेय, अशा ५० टक्क्यांहून अधिक युजर्सचे पुढच्या दोन महिन्यात ब्रेकअप होते, असे या अभ्यासात आढळून आले. एखाद्या युजर्सने आपल्या आवडत्या व्यक्तीचे प्रोफाईल किती वेळा पाहिले किंवा इव्हेंटला लाईक केले तसेच संदेश कितीवेळा पाठविला त्यावरून हे गणित मांडता येते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.