अजित पवारांना धमकी, राष्ट्रवादीत खळबळ
पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्तांना आलेल्या धमकी पत्रात अजित पवार यांचा उल्लेख आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केलाय. आम्ही या धमक्यांना घाबरत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय.
अजितदादांनीच करावं राज्याचं नेतृत्व- आबा पाटील
राज्यांच नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं त्यांच्यात कर्तृत्व आहे, अशी स्तुती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. ते पिंपरीत बोलत होते.
आयुक्तांना धमकी, अजितदादांना आव्हान?
पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त श्रीकर परदेसी यांना जीवे मारण्याची धमकी देणार पत्र मिळाल्यामुळ एकाच खळबळ उडाली असली तरी आता या मुद्द्यावर राजकीय रंग चढू लागले आहेत. ही धमकी जरी आयुक्तांना असली तरी अप्रत्यक्षपणे हे आव्हान दादांनाच असल्याची चर्चा आहे.
पुण्याचं पाणी विधानसभेतही पेटलं
पुण्याचं पाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पेटलंय. पुण्याचं पाणी दौंडला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी अजित पवारांविरोधात रोष व्यक्त केला. खडकवासलामध्ये सध्या दोन टीएमसी पाणी आहे. त्यातलं अर्धा टीएमसी पाणी दौंडला सोडण्यात येणार आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे.
अजित पवारांच्या सूचनेला कलमाडींचा विरोध
खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.
'दलित' हा शब्द अवमानकारक - अजित पवार
‘अगोदर स्वत:ला दलित म्हणायचं बंद करा!’ असा सल्ला दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी... तेही दलित महासंघाच्या मेळाव्यातच...
NCPच्या मुंबई अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी संजय दिना पाटील आणि किरण पावसकर यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. संजय दिना पाटील यांना जास्त मतं मिळाली मात्र अजितदादा आणि काही नेत्यांनी किरण पावसकर यांच्या नावाचा आग्रह धरला.
दादांचं फर्मान, होर्डिंग्ज निघाले गपगुमान!
राजकारण्यांनी अडथळा आणला नाही आणि प्रशासनानं ठरवलं तर काय होऊ शकतं, याचं चांगलं उदाहरण पुण्यात समोर आलंय. पुण्यातले फ्लेक्स काढून टाकण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करताच एका दिवसात हजारोंच्यावर फ्लेक्स आणि होर्डींग्स उतरवण्यात आली.
पवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका
मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.
मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
अजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.
'सुकन्या' अडकली राजकारणात
राज्यात भ्रूणहत्येसारख्या घटना रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आणलेल्या सुकन्या योजनेला अर्थखात्याने खोडा घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या विषयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे, यासाठी अर्थखाते सांभाळणाऱ्या अजितदादांनी काँग्रेसच्या मंत्र्याने आणलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आडवल्याची चर्चा आहे.
अपघातांना आमंत्रण देणारा उड्डाणपूल
'एकहाती सत्तेमुळे पिंपरीचा विकास करु शकलो', असं उदाहारण अजित पवार नेहमीच देतात. पण याच विकासकामांमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालाय याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत.
अजितदादा की मुंडे, केजमध्ये कोण ठरणार तरबेज?
अजितदादा विरूद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातला सत्तासंघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं. उद्या केज मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
गुटखा, पान मसाल्यावर बंदी - पवार
राज्यात लवकरच गुटखा आणि पान मसाल्यांवर बंदी घालणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.
नक्षलवादावरून 'दादा-आबां'मध्ये वाद
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्षलवादाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना टार्गेट केलंय. काल रात्री उशीरा झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात वाढत असलेल्या नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला.
सुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच
भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.