www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी संजय दिना पाटील आणि किरण पावसकर यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. संजय दिना पाटील यांना जास्त मतं मिळाली मात्र अजितदादा आणि काही नेत्यांनी किरण पावसकर यांच्या नावाचा आग्रह धरला. अखेर नाव गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय.
शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबई अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठी तब्बल दहा जण इच्छूक होते. या सगळ्यांशी पवारांनी चर्चा केली. एकमत होता नसल्यानं मतदान झालं. संजय दिना पाटलांना सर्वाधिक मतं मिळाली. तर किरण पावसकर यांना दहा मतं मिळाली. संजय पाटील यांना जास्त मतं मिळूनही अजितदादांनी किरण पावसकर यांना अध्यक्षपद मिळावं असा आग्रह धरला. त्यामुळे मुंबई अध्यक्षपद आत्ताच जाहीर करायचं नाही, असा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारचा प्रसंग येण्याची ही पहिली वेळ नाही. पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९९९ साली जेव्हा पक्ष सत्तेवर आला तेव्हा उपमुख्यमंत्रीपदाची निवड करण्यासाठी असंच मतदान घेण्यात आलं होतं. त्यावेळी पद्मसिंह पाटलांना सर्वाधिक मतं मिळाली होती. मात्र उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना डावलून छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. पुढे अनेकदा असंच घडत गेलं.