दादांनी स्वत:लाच क्लिन चीट दिलीय का?
२५ सप्टेंबरला अजित यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा... ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ... केवळ ७२ दिवसांत घडलेलं हे नाट्यं...
अजित दादा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान...
तब्बल ७२ दिवसांनंतर अजित पवार पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेत. राजभवनात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याक़डून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
अजितदादा `पॉवरफुल`च राहणार!
अजितदादा ७२ दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर मंत्रिमंडळात परतल्यानंतर कोणती खाती सांभाळणार हे आता स्पष्ट झालंय. मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर दादा पुन्हा एकदा पॉवरफुल खात्यांची सूत्रं सांभाळणार आहेत.
`पृथ्वी` मिसाईल रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे `दादा`स्त्र
आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
`दादा थांबा.. मुख्यमंत्री व्हाल` मनसेचा टोला
मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी अजित दादांच्या कमबॅकवर चांगलेच टोमणे मारले आहेत. अजित पवार पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेणार असल्याबद्दल बाळा नांदगावकरांनी प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकरांनी अजित दादांची चांगलीच खिल्ली उडवली.
ही अजित पवारांची नौटंकीच होती- फडणवीस
आजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची बातमी झी २४ तासने दिल्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया झी २४ तासकडे दिली आहे.
अजित पवार खोटारडे – सुभाष देसाई
शेवटी जे वाटत होतं तेच त्यांनी केलंय आणि त्यांनी जनतेला फसवलंय. राजीनाम्याचे नाटक. काही दिवस बाहेर राहायचं. त्याच्यातील हवा काढायची, अशा उद्देशाने त्यांनी दिलेला राजीनामा. पुढे काय झालं. आपणच परीक्षेला बसायचे आणि त्यांनीच पेपर द्यायचे आणि रिझल्ट्ससाठी त्यांनीच पेपर तपासायाचा, अशा प्रकारची लुटूपुटूची लढाई दिसत आहे. असेच राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे, अशी प्रतिक्रिया शिवेसनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली.
मुख्यमंत्री राष्ट्रवादीसमोर झुकले - खडसे
कुठेतरी राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले आणि पुन्हा अजित पवार यांचे पुनरागमन होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
अजितदादा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, `झी २४ तास`ने दिले प्रथम वृत्त
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होँणार आहे. आणि तेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि पुन्हा एकदा सत्तेत परतणार आहे.
अजितदादा म्हणतात, श्रेयासाठी लढू नका
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अनेक दिवसांची मागणी मार्गी लागली आहे.
अजितदादा- अशोक चव्हाण बॅक बेंचर्स
सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
अजितदादांचा पत्ता; आमदार निवास रूम नं. ११
सिंचन घोटाळाप्रकरणी श्वेtतपत्रिका प्रसिद्ध करून सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिलेली असली तरी मंत्रिमंडळातील त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत अजून निर्णय झालेला नाही.
पवारकाका आले पिंपरीमध्ये, पण अजितदादा आहेत कुठे?
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात आज दस्तुरखुद्द शरद पवार यांनी कित्येक वर्षानी पाऊल ठेवलं. गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड शहराचा कारभार छोटे पवार पाहत आहेत. शरद पवार यांचा कार्यक्रम असताना अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळं अपेक्षेप्रमाणं बरेच प्रश्न निर्माण झाले.
अजित पवारांची फटकेबाजी
पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच दिवसांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथले सर्व नेते एका व्यासपीठावर आले. सतत गटबाजीमध्ये गुरफटलेले हे नेते एकत्र आल्याची संधी साधत अजित पवार यांनीही जोरदार फटकेबाजी करत सर्व नेत्यांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला.
माझा बळी घेणारा पैदा व्हायचाय -अजित पवार
जलसिंचनाबाबत माझ्यावर झालेल्या आरोपांची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कुणाच्या दबावाला झुकून मी राजीनामा दिला नसून भ्रष्टाचाराच्या कुंडात माझा बळीही गेलेला नाही. माझा बळी घेणारा अजूनपर्यंत पैदा झालेला नाही, असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे काँग्रेसवर साधला.
अखेर दादांनी खरं काय ते सांगून टाकलंच!
काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद हे फक्त निवडणुकांपुरतेच असतात, ते फारसे मनावर घेऊ नका. निवडणुका संपल्या की आरोप-प्रत्यारोपही संपतात, असं उघडउघड गुपित अजित पवारांनी जाहीरपणे सांगून टाकलंय.
अजितदादांचा झंझावाती दौरा
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये झंझावाती दौरा करून अनेक विकासकामांचा आढावा घेतला.. तर काही कामांचं उद्घाटन केलं. वरकरणी हा अजित पवारांचा हा दौरा नियोजित वाटत असला तरी शहरात गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी असल्याचं स्पष्ट झालंय.
घरफोड्यांचं घर वर्षभरात फुटलं - मुंडे
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान बाबा गडावर येऊन भगवान बाबानचे दर्शन घेतले. सालाबाद प्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर गोपीनाथ मुंडे यांनी भगवान बाबा गडावर जाहीर सभा घेतली.
माणिकरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जागा वाढवण्याची मागणी करेल, असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जागा वाढवून देण्याच्या राष्ट्रवादीच्या मागणीवर टीकास्त्र सोडलय.
अजित पवारांची दमबाजी
‘उत्साहाच्या भरात काहीजण कार्यक्रम घेतात. मात्र, त्याचा काहीवेळा उगाचच पक्षाला धक्का पोहोचतो. पक्षाला धक्का पोहचवेल, असं काम करणाऱ्याला पक्षातून हाकलून दिलं जाईल’ अशी तंबीच आज अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जाहीरपणे दिलीय.