`अजितदादांचं वक्तव्यं चुकीचंच होतं`
‘अजित पवारांचे `ते` वक्तव्य चुकीचंच होतं, यापुढे अजितदादांनी जपून बोलावं’ असं म्हणत शरद पवारांनी टोचले अजितदादांचे चांगलेच कान टोचलेत.
शरद पवार म्हणतात...
ठाणे - ठाण्यात शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले. पाहुयात यावेळ त्यांनी कोणकोणत्या विषयांवर आणि काय भाष्य केलंय...
‘दादांच्या राजीनाम्याशी काँग्रेसचा संबंध नाही’
यावेळी दुष्काळग्रस्तांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीशी काँग्रेसचा संबंध नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना सवाल
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवारांना झोप कशी लागली असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
गुढीपाडवा साजरा करण्यावर बहिष्कार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या भैय्या देशमुखांविषयी बेताल वक्तव्य केलं, त्या भैय्या देशमुखांच्या पाटकुल गावानं गुढीपाडवा साजरा करण्यावर बहिष्कार घातलाय. गावातल्या एकाही नागरिकानं आपल्या घरी गुढी उभारलेली नाही.
'सू' sssकाळ राजकीय निर्लज्जतेचा?
माझा महाराष्ट्र बिघतोय, असं आता वाटू लागलेय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केलं आणि राज्यातील विचारांचा गलका झाला. अजित पवार चुकले. त्यांनी माफी मागण्यास उशीर केला. तोपर्यंत मीडियामुळे अजित पवारांची टगेगिरीची भाषा देशात पोहोचली. चहुबाजुनी टीका होऊ लागली. टीका करणे योग्य आहे. मात्र, टीकाही बेताल व्यक्तव्याच्या भाषेतच होऊ लागली. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या अकल्लेचे तारे समस्त जनतेला कळले. राजकारणात मुरलेले नेते बरळतायेत असंच चित्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. हे भक्कम असलेल्या लोकशाहीला घातक आहे.
एकतर्फी राजीनामा नाही; अजित पवारांना उपरती
‘आता पुन्हा एकदा एकतर्फी राजीनामा देणार नाही’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
राज ठाकरे भडकले, दादर आंदोलन घृणास्पद!
दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे.
अजितदादांनी सिंचनाचं पाणी वळवलं उद्योगांकडे!
अजित पवारांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. 2003 ते 2011 या काळात जलसंपदा आणि अर्थखात्याचे मंत्री असताना त्यांनी तब्बल 2 हजार दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनाकडून उद्योगांसाठी वळवल्याचं उघड झालं आहे.
शिवसेनेनेही आंदोलनाची पातळी सोडली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झालीय. अनेक संघटनांनी त्याचा निषेध केलाय. हा निषेध कायम आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध आंदोलन करताना पवारांच्या पुतळ्याला शिवांबू पाजत जोडे मारले.
मनसेच्या आंदोलनाची पातळी घसरली, पोस्टरवर लघुशंका
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनात मनसेचीही पातळी घसरल्याचं समोर आलंय. दादरला सुरू असलेल्या आंदोलनात एका लहान मुलाला पकडून त्याला अजित पवारांच्या पोस्टरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये होता.
पोलखोल : उजनीतलं पाणी बारामतीच्या डेअरीला!
उजनीत पाणी नसल्याच्या अजित पवारांच्या दाव्याची पोलखोल झालीय. उजनीत पाणी असलं तरी ते दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येत नाही तर हे पाणी जातंय बारामतीच्या डायनामिक्स डेअरीला...
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे ‘दादां’विरोधात रस्त्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मनसे कार्येकर्ते रस्त्यावर आलेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत मनसेचं आंदोलन सुरू झालंय. यावेळी या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
अजित दादांच्या बालेकिल्ल्यात उदयनराजे काय बोलणार?
एकीकडे अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं असताना त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचे खास सहकारी येणार आहेत.
अजित पवारांविरोधात सेना-भाजप-मनसे एकवटले
अजित पवारांनी 24 तासांत 3 वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. अजित पवारांविरोधात विरोधक एकवटले असून, शिवसेना-भाजप आणि मनसे जिल्ह्या- जिल्ह्यात आंदोलन करणार आहेत.
जालन्यात शौचालयाला मिळालं अजितदादांचं नाव
महाराष्ट्राच्या विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या थट्टा उडविणाऱ्या वक्तव्याने गदारोळ माजला असताना भडकलेल्या कार्यकर्त्यांनी जालनामध्ये मात्र अजित पवार यांचे नाव एका शौचालयाला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दादांच्या पाठिशी सुप्रियाताई
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेताल व्यक्तव्य केल्यानंतर माफी मागितली. अजितदादांनी चौथ्यांदा माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे `त्या` वक्तव्याच्या विषयावर पडदा पडला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
भाषण करणं अजितचा स्ट्राँग पाईंट नाही - नाना पाटेकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची सर्वच स्तरातून निंदा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अजित पवारांचे कान टोचले.
माझी चूक झाली, मला माफ करा - अजित पवार
बेताल वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांची थट्टा करणा-या अजित पवार यांना मीडियामुळे अखेर नमतं घ्याव लागलं. `झी २४ तास`ने बातमी लावून धरली होती. तर `२४तास डॉट कॉम`ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. या बातमीच्या दणक्यानंतर चौथ्यांदा अजित पवार यांनी माफी मागितली. माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली.
अजितदादांच्या बेताल वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. विरोधकांनी आक्रमक होत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. माफी नको राजीनामाच हवा अशी ठाम भूमिका घेत विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळं विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.