www.24taas.com, पुणे
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेताल व्यक्तव्य केल्यानंतर माफी मागितली. अजितदादांनी चौथ्यांदा माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे `त्या` वक्तव्याच्या विषयावर पडदा पडला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात विविध विकासकामांच्या कार्यक्रमाच्यावेळी पाणी आणि भारनियमावर घालच्या पातळीवर जाऊन अजित पवार यांनी वक्तव्य केलं. त्यामुळे संपूर्ण राज्यात वादळ उठलं. विरोधकांनी निषेध करताना राजीनाम्याची मागणी केली. मात्र, काका आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माफी मागून पुतण्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या पाठिशी राहण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
`त्या` वक्तव्याच्या संदर्भात अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करून जनतेची माफी मागितली. त्यामुळे आता `त्या` वक्तव्याच्या विषयावर पडदा पडला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे अंबाजीची वाडी येथे जनावरांच्या छावणीला सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत एका प्रश्नावर उत्तर दिले.
महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीत विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.