BJP Press Conference : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभार मानाले. विरोधीपक्षांकडून महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद असल्याचे म्हटलं होते. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, ते उल्लेखनिय आहे. देवेंद्र फडणवीस यांची सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून चांगले काम केल्याच आम्ही पाहिलं, या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंचं कौतुक केलं. (Chandrashekhar Bawankule on Mahayuti Government Next Maharashtra Chief Minister Eknath Shinde gave up his claim for the post of Chief Minister)
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, 'मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, मुंबई आणि महाराष्ट्रात विकासासाठी काम केलं. महायुतीचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली ती खूप मोठी आहे. शिंदेंची भूमिका 14 कोटी महाराष्ट्राच्या जनतेसाठी मोठी आहे. मोदींच्या नेतृत्वातील विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी जो अभूतपूर्व विजय मिळवला. महायुतीला मोठा मॅनडेट मिळाला आहे. आमच्या नेतृत्वाने हा मॅनडेट मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा कौल मिळाला. उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. त्यानंतर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी काम केलं. महायुतीला भक्कम करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं.'
शिंदेंचं कौतुक करताना ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे कधी रडणारे नाहीत ते लढणारे नेते आहेत. केंद्र नेतृत्त्वाचा त्यांनी कधी अपमान केला नाही. केंद्र नेतृत्त्वाने जे काही सांगितलं ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं. त्यांनी कशालाही नाही म्हटलं. महायुती कधीही मुख्यमंत्रिपदासाठी लढत नव्हते. तर आम्ही महाराष्ट्राचा विकासासाठी लढतोय. पण महाविकास आघाडी ही मुख्यमंत्रिपदासाठी लढत होती. त्यांनी 8 मुख्यमंत्रिपदाचे चेहरे समोर केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा जनतेने योग्य ती भूमिका घेतली, असं टोला त्यांनी महाविकास आघाडीला मारला.'
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र नेतृत्त्व अमित शाह मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मोदी आणि शाह हे निर्णय घेतील त्याला एकनाथ शिंदे आणि शिवसेना पाठिंबा दिला आहे. म्हणून भाजपकडून बावनकुळे यांनी आभार मानला आहे. गुरुवारी 28 नोव्हेंबर केंद्र नेतृत्त मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय घेणार आहेत', असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.