This Inspector Once Slapped Dilip Kumar : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांविषयी बोलायचं झालं तर त्यात दिलीप कुमार यांचं नाव येतं. दिलीप कुमार यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. दरम्यान, त्यांच्याविषयी सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या गोष्टींविषयी एक म्हणजे त्यांना एका इंस्पेक्टरनं कानशिलात लगावली होती. इतकंच नाही तर त्या इंस्पेक्टरचं नाव नाना पाटेकर देखील आदरानं घेतात. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा इंस्पेक्टर कोण आहे? चला तर आज त्याच्याविषयी जाणून घेऊया.
हा इंस्पेक्टर दुसरा कोणी नसून अभिनेते राज कुमार आहे. राज कुमार आणि दिलीप कुमार यांच्यात असलेलं शत्रुत्व हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्यात असलेलं ही शत्रुत्व खूप जूनी आहे. त्या दोघांमध्ये असलेला वाद तेव्हा वाढला जेव्हा राज कुमार यांनी दिलीप कुमार यांच्या कानशिलात लगावली होती. 1959 मध्ये रामानंद सागर यांच्या प्रदर्शित झालेल्या कॉमेडी-ड्रामा 'पैगाम' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, एका सीनचं शूट करत असताना राज कुमार यांनी दिलीप कुमार यांना कानशिलात लगावली होती.
हेही वाचा : 'चित्रपट साईन कर नाहीतर...', जेव्हा शाहरुख खानला अंडरवर्ल्डने दिली होती धमकी, 'तुला जीवे मारु अन्....'
आता नेमकं कशामुळा राज कुमार यांनी कानशिलात लगावली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा चित्रपटातला एक सीन होता. खरंतर दिलीप कुमारला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त जोरात राज कुमार यांनी कानशिलात लगावली होती. त्यानंतर दिलीप कुमार यांना खूप राग आला होता. या घटनेनंतर त्या दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. तर 1991 मध्ये सौदागर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, त्यांच्यात सतत वाद व्हायचे असे म्हणतात. या चित्रपटातील होळी सीनमध्ये राज कुमार यांनी मुठभर गुलाल हा दिलीप कुमार यांच्या चेहऱ्यावर फेकला. आता त्यात काय असा विचार तुम्ही करत असाल. तर असं नसून राज कुमार यांना आधीच सांगितलं होतं की असं काही करू नका. या घटनेनंतर शूट रद्द करण्यात आलं. कितीही वाद किंवा शत्रुत्व असलं तरी त्या दोघांनी या चित्रपटात खूप चांगली कामगिरी केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.