नागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आज नागपूरला पोचले आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.
राज ठाकरे भडकले, दादर आंदोलन घृणास्पद!
दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे ‘दादां’विरोधात रस्त्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मनसे कार्येकर्ते रस्त्यावर आलेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत मनसेचं आंदोलन सुरू झालंय. यावेळी या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
राज ठाकरेंना जामीन मिळाला पण.....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी जळगाव कोर्टात हजर होते. रेल्वे भरती प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर जळगावमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`
मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.
राजना गैरहजर राहण्याची कोर्टाची परवानगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावार त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच यापुढे सुनावणीस गैरहजर राहण्याचीही त्यांना परवानगी देण्यात आलीय.
राज ठाकरे हाजीर हो....
राज ठाकरेंची आज जळगाव कोर्टात हजेरी आहे. 1 फेब्रुवारी रोजी बजावलेल्या समन्सनंतरही राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिल्यानं त्यांना 8 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर राहिण्याचे आदेश देण्यात आले होते.
मुंब्र्यातील बिल्डर परप्रांतीय होता – राज
मुंब्र्यात जी इमारत पडली, ती बांधणारा हा परप्रांतीय होता. तर मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी १०० टक्के हे उत्तरप्रदेशचे आहेत, अशी पोलिसांची माहिती असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत मुद्दा उपस्थित करून पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध
मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
अजित पवारांना सत्ता आणि पैशाचा माज आलाय - राज
जळगावात भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळीही राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं. इंदापूरच्या भाषणात अजित पवारांनी कमरेखालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यांचा राज ठाकरेंनी आज खरपूस समाचार घेतला.
आजच्या भाषणात काय म्हणाले राज?
आज जळगावात राज ठाकरेंनी कुठकुठले मुद्दे मांडले? काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा होत आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यातली ही शेवटची सभा आहे. त्याच अजितदादा पवार यांनी दुष्काळाबाबत थट्टा केल्याने राज काय बोलणार याकडे लक्ष लागलेय.
राज कडाडले, खडसेंवर केले पुन्हा एकदा आरोप...
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा खडसेंवर टीका केली. विरोधी पक्ष नुसता चहापानापुरता का? असा सवाल त्यांनी केला आहे. खडसे सेटलमेंट करतात असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
राहुल गांधीचा अभ्यास आहे का? - राज ठाकरे
राहुल गांधीचा अभ्यास नाही. काही तरी बोलावं म्हणून ते बोलत असतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राहुलना टोला लगावलाय.
राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?
आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या दौ-यात जळगावमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाकुणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
मराठा आरक्षणला राज ठाकरेंचा विरोध...
मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.
आज जळगावात धडकणार राज; कार्यकर्त्यांची धावपळ
राज ठाकरेंची ७ एप्रिलला जळगावामध्ये जाहीर सभा होणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. तर राज ठाकरे त्या सभेसाठी आजच जळगावात दाखल होणार आहेत.
पहा राज ठाकरेंनी कोणाला केलं एवढं भावूक...
९ आणि १० मार्चला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कर्णबधिरांसाठी मोफत कान तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं होत.
जळगावात राज कुणाला करणार टार्गेट?
कोल्हापूर, खेड, सोलापूर, जालना, अमरावतीमध्ये सभा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्रात 7 एप्रिलला आपली सभा घेणार आहेत. त्यात यावेळी ते कुणाला टार्गेट करणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे.
राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात घडतंय काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेत.. शहर विकासाला चालना देण्यासाठी आज सकाळपासून अधिकारी आणि पदाधिका-यांच्या बैठका राज घेत आहेत.