राज ठाकरे पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधणार?
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असून ७ एप्रिलला जळगावातील सभेने त्यांच्या या दौऱ्याची सांगता होणार आहे.
राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात
मराठवाडा-विदर्भानंतर आजपासून राज ठाकरेंचा झंजावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात सुरू होतोय. आज राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून चार दिवस खांदेशचा दौराही ते करणार आहेत.
`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`
नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.
पुण्यात मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात
महापालिकेतील मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. मनसेच्या 2 नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने विरोधी पक्षावर कॉग्रेसने दावा सांगितलाय.
निलंबित आमदार क्षितीज ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला
निलंबित आमदार क्षितीज ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
खुनाचा प्रयत्न, मनसे नगरसेवकाला एक वर्षाची शिक्षा
जळगाव महापालिकेतल्या त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक ललित कोल्हे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं एका खटल्यात वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय.
...तर राज ठाकरे महाराष्ट्र विकून खातील’
‘माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन’ असे वेळोवेळी सांगणाऱ्या मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या हातात सत्ता गेली तर मिलच्या जागांसह ते संपूर्ण महाराष्ट्र ते विकून खातील’, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नाशिक येथे केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड
इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हल्लाबोल केला आहे. मनसैनिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड केली.
पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित
महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.
सचिन सूर्यवंशींना अटक कधी?
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.
मनसेचे अमरावतीतही इंडियाबुल्समध्ये खळ्ळ-खट्याक
अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सवर केलेल्या टीकेनंतर मुंबईनंतर आता अमरावतीतही त्याचे पडसाद पडले आहे. अमरावतीतील इंडियाबुल्सच्या क्षेत्रीय कार्यालयावर मनसेच्या २५ ते ३० जणांच्या जमावाने हल्ला केला
आमदार क्षितीज ठाकूर देणार राजीनामा?
पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मारहाणप्रकरणी शुक्रवारी अटक झाल्यानंतर ते कोठडीत होते. आज त्यांना जामीन मिळालाय.
मनसे, बविआच्या निलंबित आमदारांना जामीन
पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आलेय.
मुंबईत मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक
राज ठाकरे यांनी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
राज ठाकरे येणार अडचणीत?
मुंबईतील परळमधील इंडीया बुल्सच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यामुले मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे?- राज
गेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला.
सरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं- राज
राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले.
EXCLUSIVE- परळ येथील इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला!
राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले आहेत. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला असून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
अजित पवार, ७० हजार कोटी रुपये गेले कुठे? - राज
अमरावती येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. सिंचनाचं पाणी इंडियाबुल्सला देऊ नका असं सभेपूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार आहे. राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलं आहे.