... तर माझा प्रकल्पांना विरोध - राज ठाकरे
मरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय.
राम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेले आमदार राम कदम यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत.
अजित पवार, राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे नेते न्यायालयात काम म्हणणे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्षांच्या आमदारांवरच कारवाई का? - राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधीमंडळ मारहाण प्रकरणातील आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
माझी प्रगती अनेकांना खुपतेय – राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादानं आपण मोठे होत असून आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपतेय, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राम कदम यांनी दिलीय. त्यामुळे राम कदम यांचा नेमका रोख कुणावर होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
राज ठाकरेंना थकवा, ४८ तास विश्रांतीची गरज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ४८ तास सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे उर्वरित दौऱ्याच्या आधी पुन्हा डॉक्टर तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.
राम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी
प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.
मी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.
राज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?
‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.
पोलीस मारहाणीने राज ठाकरे झाले संतप्त
आमदार क्षितिज ठाकूर यांनी विधान परिसर आवारात एका पोलिसाला मारहाण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतप्त झालेत. यामध्ये अन्य काही आमदारांचा हातही आहे.
राज ठाकरेंनी नागपुरात केले पाय मोकळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सांयकाळी थोडासा निवांत वेळ काढला आणि त्यांनी नागपुरात पायी चालणं पसंत केली.
राज ठाकरे यांना थकवा, दौरा रद्द
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना खूप थकवा जाणवत असल्याने त्यांनी आजचा मुरमाडी दौरा रद्द केला आहे. राज सध्या नागपुरात आहेत.
वणीमध्ये राज ठाकरेंचं तुफान स्वागत
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तुफानी स्वागत झालं. १५ ते २० हजार तरुण कार्यकर्त्यांच्या हजेरीत राज ठाकरे यांचे वणी येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला.
राज ठाकरे दुसरं दुकान थाटू नका - पवार
पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ४९व्या अधिवेशनात पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.
राज ठाकरे यांचे चंद्रपूरमध्ये आगमन....
राज्यव्यापी दौ-यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज दोन दिवसाच्या मुक्कामासाठी चंद्रपूर शहरात आगमन झालं.
राज यांचा महाराष्ट्र दौरा, नागपूरात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.
राज ठाकरे `त्या` तीन बहिणींच्या गावाला देणार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपुरात दाखल होत आहेत राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात करत आहेत.
युतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे
‘युती’ म्हणजे गिरगावच्या चौपाटीवरील भेळीचे दुकान नव्हे. त्यात काहीही मिसळावे आणि चव बिघडवावी!, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखात महायुतीत राज ठाकरे यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे.
राज ठाकरेंचा उर्वरित महाराष्ट्र दौरा सुरू...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात विदर्भामध्ये राज ठाकरे आपला दौरा करणार आहे.