टोल`फोड`च्या बोलावर राज ठाकरेंवर तिसरा गुन्हा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्य़ाचा आरोप ठेवण्यात आलाय.
टोल न भरताच पुढे निघाला राज ठाकरेंचा ताफा!
पुणे दौऱ्यासाठी निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी, खालापूर आणि उर्से टोल नाक्यावर टोल न भरताच रवाना झाले.
राज ठाकरेंच्या अटकेचं राज्य सरकारसमोर आव्हान
राज्यात मनसेनं छेडलेल्या टोल आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता आहे.
धमक्यांवर टोल वसुली बंद होणार नाही - राणे
धमक्या देऊन राज्यातील वसुली बंद होणार नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरेंना ठणकावलं आहे. टोलमुळेच रस्त्यांमध्ये सुधारणा झाली आहे.
तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई -अजित पवार
मनसेनं सुरू केलेल्या टोल विरोधातल्या आंदोलनावर आता सरकारनं कारवाईचे संकेत दिले आहेत. टोलची तोडफोड करून कायदा हातात घेणा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.
राज इशाऱ्यानंतर टोल नाक्याचं खळ्ळ खट्याक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा टोलविरोधी आक्रमक भूमिका घेतलीय. टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवे आले तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यानंतर लगेच याची अंमलबजावणी केली आणि ऐरोलीतील टोल नाक्याची तोडफोड केली गेली.
आम्ही गांडू नाहीत, 'दादा'गिरी चालणार नाही - राज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईत गरजलेत. त्यांनी राज्य सरकारला टार्गेट केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. अजित पवार आम्ही गांडू नाहीत. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.
राज ठाकरेंनी तंबी देताच ते लागलेत चक्क कामाला
नाशिक महानगर पालिकेच्या कारभाराबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी कामाला लागलेत. रोजच्या बैठका आणि पाहाणी दौरे करून नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला सुरूवात केलीय.
`धागे बांधण्यापेक्षा, युवकांच्या जवळ जा, प्रश्न समजून घ्या`
शिवसेनेच्या शिवबंधनावर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे, धागे बांधून कुणी कुणाच्या बंधनात अडकत नसतं, यापेक्षा युवकांच्या जवळ जा आणि लोकांचे प्रश्न समजून घ्या, असा सल्ला आणि टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.
नाशिकनंतर राज ठाकरेंचा मोर्चा पुण्याकडे....
मनसेच्या नाशिकमधील नगरसेवकांची मुंबईत झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये येणार आहेत.
राज ठाकरेंकडून महापौर यतीन वाघ यांची खरडपट्टी
नाशिक महापालिकेत सत्तेची दोन वर्ष पूर्ण केलेल्या महापौर आणि मनसे नगरसेवकांच्या कामांचं ऑ़डिट पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केलं. कृष्णकुंजवर घेतलेल्या बैठकीत महापौर यतीन वाघ यांची राज ठाकरेंनी चांगलीच खरडपट्टी काढली.
मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना जामीन
मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना गुरूवारी जामीन मिळाल्याने त्यांची सुटका झाली आहे.
आम्ही बापाचे बाप, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आम्ही ‘आप`चे बाप आहोत हे विधान केलं होतं. त्यावर उत्तर देत आयपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उत्तर दिलंय. आठवले म्हणतात, आम्हाला ‘आप`चा बाप होऊन ‘पाप` करायचे नाही. तुम्ही ‘आप`चे बाप असाल, तर आम्ही बापाचे बाप आहोत.
नाशिकच्या कारभारावर राज ठाकरे चिडलेत, विरोधात बसा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौ-यानंतर महापौर बदलणार या चर्चेला उधाण आलंय. नगरसेवकांच्या बैठकीमध्ये राज यांनी महापालिकेच्या कारभारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सत्तेत बसून काम करु शकत नसेल तर विरोधात बसलेलं कधीही चांगलं असं सुनावून राज बैठकीतून उठून गेलेत.
नाशिकवरून राज ठाकरे मुंबईत परतलेत, टीकेची झोड कायम
नाशिक दौऱ्यावरून राज ठाकरे मुंबईत परतलेत. मात्र, राज यांच्या व्यक्तव्यावरून भाजप आणि मनसेत दुरावा झालाय. आता तर महाराष्ट्रात आम्हीच बाप आहोत असं ठणकावणा-या राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी तातडीने प्रत्युत्तर दिलं होतं. आता छगन भुजबळ यांनी राज यांना टोला मारलाय. महाराष्ट्राचा बाप होण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा प्रबोधनकारांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवा असं भुजबळ यांनी म्हणाले.
`रात्रपुत्र` राजकारणात सक्रिय?
मनसेच्या पाठशाळेत सध्या एक `राजपुत्र` राजकारणाची बाराखडी गिरवतोय. राज ठाकरेंप्रमाणेच या युवराजांचीही सध्या पक्षात हळूहळू क्रेझ वाढतेय. कोण आहेत हे युवराज आणि कसा सुरु आहे त्यांचा कोचिंग क्लास...!
लोकसभेसाठी कसं असेल राज ठाकरे यांचं धक्कातंत्र?
लोकसभेच्या उमेदवार निवडीसाठी राज ठाकरें यंदा धक्कातंत्राचा अवलंब करणार आहेत. प्रस्थापित नेत्यांपेक्षा बिगर राजकीय चेह-यांना उमेदवारी देण्याकडे राज ठाकरेंचा कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. हा `आप`चाच प्रभाव असल्याचं मानलं जातंय.
राज ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार, युती तोडा - भाजप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींवरील विधानानंतर नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे आणि भाजपमध्ये कटूता वाढलीये. उद्या होणा-या भूमिपूजन आणि विकास कामांच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकलाय. दरम्यान, मनसेबरोबरची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
राज ठाकरे असं का बोलले?
नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी आम आदमी पार्टीवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली... या टीकेमागची कारणं काय आहेत ? याचा हा आढावा....
गोडव्यानंतर राज ठाकरे यांचा मोदींबाबत `यू टर्न`
अगदी कालपरवापर्यंत नरेंद्र मोदींच्या कामाचे गोडवे गाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मोदीविरोधी `यू टर्न` घेतल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्यात. या `घूमजाव`मागचे नेमके कारण काय? एक विशेष रिपोर्ट.