नाशिकमध्ये काय म्हणाले राज ठाकरे !
महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत अग्रस्थानी, पण आलेख चढता हवा - राज ठाकरे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची माझी इच्छा आजही कायम - राज ठाकरे
राज ठाकरे लागले कामाला, चार दिवसांचा दौरा!
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळेच पक्ष कामाला लागले असताना मनसेही आता मागे राहिलेली नाही. महापालिकेतली पहिली सत्ता, तीन आमदार आणि ४० नगरसेवक देणा-या नाशकात राज ठाकरेंचा चार दिवस दौरा आहे...
मनसैनिकच उठले मराठी माणसाच्या रोजगारावर!
नोक-या आणि रोजगारामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची भाषा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जाते. परंतु प्रत्यक्षात मनसेचे कार्यकर्तेच स्थानिकांच्या हातातला रोजगार हिरावून घेण्याचं काम करतायत...
मनसे मनोमिलन, बिग बीची सुरक्षा वाढवली
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे नाराज झालेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
मनसे नगरसेवकाला मारहाण भोवणार
महापालिकेतील दूरसंचार अभियंता राजेश राठोड मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक गिरीश धानुरकरांना मारहाण भोवणार अशी चिन्ह आहेत...मारहाण प्रकरणी मनसे नगरसेवक गिरीश धानुरकरांना महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंनी धानुरकरांना नोटीस पाठवलीय.
`राज ठाकरेंसाठी नाही कष्टकऱ्यांसाठी मनसेच्या स्टेजवर`
‘चित्रपटसृष्टीत पडद्यामागे कष्ट करणाऱ्या, राबणाऱ्या हातांसाठी मनसेनं काहीतरी करण्यासाठी पाऊल उचललंय... ते कौतुकास्पद आहे... आणि म्हणूनच राज ठाकरेंसोबत मी मनसे कार्यक्रमात हजेरी लावली’
राज ठाकरे जेव्हा अमिताभ बच्चन यांचे पाय धरतात...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांचे आर्शीवाद घेतले. निमित्त होतं मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापनदिनाचे. राज आणि अमिताभ एकाच व्यासपिठावर येणार याचीच चर्चा होती. यावेळी काय दोघे बोलतात याची उत्सुकता होती. मात्र, राज यांनी झालं गेलं गंगेला मिळालं, असं सांगून अभिताभ राग मनातून काढून टाकला
राज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्लाबोल
‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा कालच्या कार्यक्रमात मनोमिलन केलं. पण इतके वर्ष राज ठाकरे यांनी मराठी तरुणांची माथी भडकवली, उत्तर भारतीयांना मारहाण करून त्यांचे संसार उद्धवस्त केले, हे सर्व गंगेला मिळालं का? असा सवाल करत काँग्रेसने गंगेला काय मिळालं हे राज ठाकरे यांनी स्पष्ट करावं, असा जोरदार टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांचा गुजरातच्या `गोदीं`वर हल्लाबोल
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. एकीकडे जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कारभारावर खरमरीत शब्दांत टीकास्त्र सोडतानाच, दुसरीकडे राज ठाकरेंनी गुजरातवरही हल्ला चढवलाय.
काय बोलले <B><font color=red>राज ठाकरे आणि अमिताभ </font></b>
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन काय बोलले यातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे.....
राज - अमिताभ : वाद विसरून दोन दिग्गज एकाच व्यासपीठावर!
मनसेच्या आजच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा सुवर्णयोग जुळवून आणलाय.
राज ठाकरे- बिग बी यांच्यात समेट
बिग बी अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात समेट झाली असून येत्या सोमवारी मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमात बिग बी उपस्थित राहणार आहेत.
‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!
ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनाला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. याआधी आम आदमी पार्टीटे कुमार विश्वास यांनी भेट घेतली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला. अण्णांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता मनसेने पाठिंबा दर्शवून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले आहे.
बाळासाहेबांच्या शिल्पाला राज ठाकरे टच
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शिल्प नाशिकच्या सोनावणे बंधुंनी साकारलंय. या शिल्पाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी सोनावणे बंधुंनी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखवलं. राज यांनी त्यात बारकावे सूचवत शिल्पाला स्वतःचा टच दिला.
दादर ऐवजी विक्रांतला हेरिटेजचा दर्जा द्या! - राज ठाकरे
दादरमधील प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी राज्य सरकारला बजावलेय की, दादर ऐवजी विक्रांतला हेरिटेजचा दर्जा द्या! देशाची गौरवशाली युद्धनौका आयएनएस विक्रांत लिलावात काढण्यात येण्याचे संकेत मिळताच. तिचे जतन व्हावे, अशी राज यांची इच्छा आहे.
आठवले पलटले : राज ठाकरेंनाच हाणलाय टोला!
शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजीनाट्य घडत असलं तरी मित्रपक्ष म्हणून उद्धव ठाकरेंवर विश्वास असल्याचं रिपाइं नेते रामदास आठवले यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांची हातसफाई
राज ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांनी हातसफाई दाखवली आहे. या दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे मंगळसूत्र आणि चेन तर काहींचे मोबाइल आणि पाकीट चोरट्यांकडून लांबवण्यात आल्याचे समोर आले आहे.
<B> मनसेचा एक निर्णय... आणि राज ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढ! </b>
शासकीय प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला बोलावून पार पाडण्याची प्रथा सध्या जोरावर आहे. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच वृत्तीवर आपला आक्षेप व्यक्त केलाय.
राज ठाकरे- सलमान खान एकाच व्यासपिठावर
मुंबईतल्या माहिममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोळी महोत्सवाचं आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. मनसे महोत्सवाला अभिनेता सलमान खान यांने खास उपस्थिती लावत चाहत्यांशी संवाद साधल.